25 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. अशात चुकीच्या आहारामुळे पोट बिघडू शकतं. त्यामुळे उन्हाळ्यात काय खाणं टाळायला हवं हे जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात तळलेले पदार्थ आणि भाजलेलं खाऊ नये. तळलेले पदार्थ पचनास जड असतात, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात फार मसालेदार खाऊ नये. मसालेदार खाल्यास शरीराचं तापमान वाढू शकतं, ज्यामुळे जास्त घाम येऊ शकतो तसेच पोटात जळजळ होऊ शकते.
उन्हाळ्यात जंक आणि फास्ट फूड खाणं टाळावं. जंक-फास्ट फूड आरोग्यासाठी घातक असतं.
कॉफी, चहा आणि कोल्ड ड्रिंकसारख्या जास्त कॅफिन आणि साखर असलेलं पेय घेऊ नये. हे पेय घेतल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.
उन्हाळ्यात अति गोड खाऊ नये. त्यामुळे शरीरात साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
उत्तम आरोग्यासाठी मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र उन्हाळ्यात आणखी मीठ कमी खायला हवं.