Mango : आंबे खाणं कुणी टाळावं? जाणून घ्या

6 मे 2026

Created By:  संजय पाटील

आंब्यांचा हंगाम सुरु झालाय. अनेक जण चवीने आंबे खातात. मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असल्याने आंबे खाण्याचे फायदे आहेत. मात्र कुणी आंबे खाणं टाळवं हे आपण जाणून घेऊयात.

मधुमेह अर्थात डायबेटिजचा त्रास असणाऱ्यांनी आंबे खाण्यापासून 2 हात दूर रहावं. आंब्यात नैसर्गिक साखर जास्त असते. त्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढू शकतं.

वजन कमी करणाऱ्यांनी मर्यादेत आंबे खावेत. जास्त आंबे खाल्यास शरीरात कॅलरीज वाढून वजन वाढू शकते.

काहींना आंबे खाल्याने खाज, जळजळ असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आंबे खाणं टाळावं.

गॅस, अपचन आणि ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी जास्त आंबे खाऊ नये. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

किडनी संबधित आजार असलेल्यांनी जरा जपूणच आंबे खावेत. आंब्यातील पोटेशियममुळे काहींना त्रास होऊ शकतो.

शरीरात जास्त उष्णता  आणि पिंपल्सचा त्रास असल्यानेही जास्त प्रमाणात आंबे खाण्याचा मोह टाळावा. तसं न केल्यास संभाव्य धोका उद्धभवू शकतो.