इथे वाहतो आगीचा धबधबा; हे अद्भुत दृश्य दिसते फक्त ३ मिनिटांसाठीच
14 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हॉर्सटेल फॉल नावाचा एक धबधबा आहे, ज्याला 'अग्नीचा धबधबा' म्हणतात
खरंतर, एका विशिष्ट वेळी, या धबधब्याचे कोसळणारा प्रवाह अशा प्रकारे आगीचा असल्यासारखा भासतो
हॉर्सटेल फॉल्स हा योसेमाइट राष्ट्रीय उद्यानात स्थित एक हंगामी धबधबा आहे, ज्याला जगातील सर्वात अद्वितीय धबधबा देखील म्हटले जाते
जेव्हा मावळत्या सूर्याची किरणे धबधब्यावर पडतात तेव्हा तो लाल-नारिंगी रंगाचा होतो. जणू काही तो आगीचा धबधबाच आहे
तथापि, ही नैसर्गिक घटना दरवर्षी फक्त 10 ते 27 फेब्रुवारी दरम्यानच पाहता येते. हे आश्चर्यकारक दृश्य 3 मिनिटांसाठी दिसते
याचा एक व्हिडिओ @miracleofnature___ या इन्स्टा हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून नेटकरी देखील थक्क झाले
जिभेवर पिवळे किंवा लाल रंग दिसणे म्हणजे या आजाराची लक्षणे…, तज्ज्ञांनी सांगितलं हे रंग हलक्यात घेऊ नका?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा