हा प्रसिद्ध अभिनेता घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या साफ करायचा, आता बॉलिवूडमध्ये कामावतोय करोडो
बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी या अभिनेत्याने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. हा अभिनेता बॉलिवूडमध्ये येण्याआधी घरोघरी जाऊन टाक्या स्वच्छ करायचा. पण आज तो एक यशस्वी अन् करोडोंची संपत्ती असलेला अभिनेता आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते असे आहेत ज्यांनी संघर्षाने आपलं नाव बनवलं आहे. बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कोणाला संघर्ष चुकलेला नाही. पण काही अभिनेत्यांच्या संघर्षाची कहाणी ही खरोखरच प्रेरणादायी आहे. आज त्यांचं स्टार्डम पाहून कोणालाही वाटणार नाही की, या कलाकारांनी असेही दिवस काढले. अनेक कलाकार फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत असताना छोटीमोठी कामही करत असतं. असाच एक अभिनेता होता ज्याने बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत असताना घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या साफ करण्याचं काम केलं. आणि आज त्याचं बॉलिवूडमध्ये नाव प्रसिद्ध आहे.अनेक उत्तम चित्रपट त्याने दिले आहेत.
अभिनेत्याने संघर्षमय दिवसांबद्दल सांगितले.
या अभिनेत्याने त्याच्या या संघर्षाची कहाणी कॉमेडी किंग कपिल शर्माचा नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये सांगितली आहे. हा अभिनेता म्हणजे प्रतीक गांधी. नुकत्याचं पार पडलेल्या कपिल शर्मा शोच्या एपिसोडमध्ये प्रतीक गांधी, जितेंद्र कुमार, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे पाहुणे म्हणून आले. संभाषणादरम्यान प्रतीक गांधी यांनी कपिल शर्माला त्यांच्या संघर्षमय दिवसांबद्दल सांगितले. प्रतीक गांधीने सांगितले की, अभिनयाच्या जगात यशस्वी होण्यापूर्वी त्याने सर्व प्रकारची छोटी-मोठी कामे केली होती.
घरोघरी जाऊन टाक्या स्वच्छ करण्यासाठी जायचा अभिनेता
प्रतीक गांधीने सांगितले की त्याने घरोघरी भेटवस्तू वाटण्याच काम केलं. याशिवाय त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये मदतनीस म्हणूनही काम केले आहे. तसेच मुंबईत आल्यानंतरचा अनुभव सांगताना म्हटले की, “मी मुंबईत आलो तेव्हा मी पाण्याचे टाक्या साफ करायला सुरुवात केली. यासाठी मी 2 ते 3 लोकांना कामावर ठेवले होते जे टाकीच्या आत जाऊन ते स्वच्छ करायचे, परंतु बऱ्याचदा असे व्हायचे की कामगार कामावर येत नव्हते. मग मी स्वतः लोकांच्या घरी जाऊन टाकी साफ करायचो.”
View this post on Instagram
या संघर्षाबद्दल काय म्हणाला अभिनेता?
प्रतीक गांधी म्हणाला की,तो हे काम करण्यासाठी योग्य मशीन्सचा वापर करायचा. प्रतीक गांधीने आतापर्यंत ‘दो और दो प्यार’, ‘अग्नि’, ‘धूम धाम’ आणि ‘घोटाळा’ असे अनेक उत्तम प्रोजेक्ट केले आहेत. जेव्हा प्रतीक गांधी आणि इतर कलाकार कपिलच्या शोमध्ये अभिनयात प्रवेश करण्याबद्दल बोलत होते, तेव्हा विजय वर्मा आणि जितेंद्र यांचा उल्लेख आला तेव्हा ते म्हणाले की, इंजिनिअर झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचे आहे हे समजते.
