AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : स्मृती मंधानाचं जोरदार कमबॅक, 18 धावा करताच वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला

Smriti Mandhana 4 Thousand T20i Runs : स्मृती मंधाना हीच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही आठवड्यात अनेक संकटं आली. त्यामुळे स्मृती या सर्व अडचणींवर मात करत कशी कमबॅक करते? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. स्मृतीने पहिल्याच सामन्यात 25 धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

Smriti Mandhana : स्मृती मंधानाचं जोरदार कमबॅक, 18 धावा करताच वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला
Smriti Mandhana Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 21, 2025 | 11:31 PM
Share

वूमन्स टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर मात करत जोरदार कमबॅक केलं आहे. स्मृतीने पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न मोडल्यानंतर धमाका केला आहे. स्मृती आणि टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपनंतर आपल्याच पहिल्याच आंतरराष्ट्रीय आणि टी 20i सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारताने विशाखापट्टणममध्ये 122 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने 8 विकेट्सने सामना जिंकला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या या विजयात स्मृतीने छोटी पण निर्णायक खेळी केली. स्मृतीने यासह ऐतिहासिक कामगिरी केली.

स्मृतीने या सामन्यात 100 च्या स्ट्राईक रेटने 25 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. स्मृतीने या दरम्यान 4 चौकार लगावले. स्मृतीची या दरम्यानची 18 वी धाव अविस्मरणीय अशी ठरली. स्मृतीने यासह 4 हजार टी 20i धावा पूर्ण केल्या. स्मृतीने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. स्मृती वूमन्स टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 4 हजार धावा करणारी पहिली तर एकूण दुसरी फलंदाज ठरली.

सुझी बेट्सचा रेकॉर्ड ब्रेक

स्मृतीने वेगवान 4 हजार टी 20i धावा करण्याबाबत न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृचीने 3 हजार 227 चेंडूत 4 हजार धावा पूर्ण केल्या. तर सुझीला 4 हजार रन्ससाठी 3 हजार 675 बॉलचा सामना करावा लागला होता. तसेच या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही सुझीच्या नावावर आहे. तर स्मृती दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. सुझीने 4 हजार 716 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर विराजमान आहे.

वूमन्स टी 20i मध्ये सर्वाधिक धावा

सुझी बेट्स, 4 हजार 716 धावा

स्मृती मंधाना, 4 हजार 7 धावा

हरमनप्रीत कौर, 3 हजार 654 धावा

चमारी अट्टापट्टू, 3 हजार 473 धावा

सोफी डीव्हाईन, 3 हजार 431 धावा

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी

स्मृती पहिली सक्रीय भारतीय क्रिकेटर

तसेत स्मृतीने 4 हजार टी 20i धावा पूर्ण करत बहुमान मिळवला आहे. स्मृती अशी कामगिरी करणारी तिसरी तर पहिली सक्रीय भारतीय क्रिकेटर (महिला+पुरुष) ठरली आहे. भारतासाठी आतापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20i क्रिकेटमध्ये 4 हजार धावा केल्या आहेत. मात्र रोहित आणि विराट या दोघांनीही या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहितने टी 20i कारकीर्दीत 4 हजार 231 रन्स केल्या आहेत. तर विराटच्या नावावर 4 हजार 188 धावांची नोंद आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.