AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026, IND vs PAK : पाकिस्तानच्या कर्णधाराची मागणी सूर्यकुमार यादवने केली मान्य, म्हणाला…

भारत पाकिस्तान सामन्याकडे साऱ्या क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. कारण हा सामना क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी असतो. या सामन्यात कोण बाजी मारणार? हे येणार काळ सांगेल. पण त्यापूर्वी दोन्ही संघात शब्दयुद्ध रंगलं आहे. चला जाणून घेऊयात पाकिस्तानच्या कर्णधाराला सूर्यकुमार यादवने काय उत्तर दिलं.

T20 WC 2026, IND vs PAK : पाकिस्तानच्या कर्णधाराची मागणी सूर्यकुमार यादवने केली मान्य, म्हणाला...
पाकिस्तानच्या कर्णधाराची मागणी सूर्यकुमार यादवने केली मान्य, म्हणाला..Image Credit source: pti/instagram
| Updated on: Feb 14, 2026 | 7:09 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 27व्या सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. या सामन्यातील प्रत्येक अपडेट असेल तिथे घेण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कारण दोन्ही संघातील सामन्याला युद्धाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान हे संघ फक्त मल्टी नॅशनल स्पर्धेतच भिडतात. आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येतात. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आणखी ताणली जाते. आता 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान संघ भिडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांकडून शा‍ब्दिक चकमक सुरू झाली आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या स्पर्धेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपलं म्हणणं मांडलं. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने आपलं म्हणणं मांडल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याला उत्तर दिलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने अभिषेक शर्मा फिट व्हावा आणि आमच्याविरुद्ध खेळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अभिषेक शर्माची तब्यते खराब असल्याने पाकिस्तान विरुद्ध खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. असं असताना पाकिस्तान संघाच्या कर्णधाराची इच्छा पूर्ण होईल असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. सूर्यकुमार यादवच्या या सकारात्मक उत्तराने अभिषेक शर्मा या सामन्यात खेळेल अशी आशा बळावली आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘जर पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराची इच्छा अभिषेक खेळावा अशी असेल तर तो नक्कीच खेळेल.’ इतकं सांगून सूर्यकुमार हसू लागला. यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर फिट असून त्याच्या खेळण्याबाबतही संकेत दिले आहेत.

प्लेइंग 11 मध्ये काय बदल होणार?

अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर संघात खेळणार असे संकेत मिळत आहे. त्यामुळे दोन खेळाडूंना बाहेर बसण्याची वेळ येणार आहे. संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्मा उतरेल यात काही शंका नाही. तर रिंकु सिंहची बॅट काही मागच्या दोन सामन्यात चालली नव्हती. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जागा घेऊ शकतो. कारण पाकिस्तानविरुद्ध फिरकीचा मारा करण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदरची गरज संघाला असणार आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?