राडाच केला की राव, दिवाळी पार्टीत तरुणीचा जबरदस्त डान्स, सहकारी बघतच राहिले
दिवाळी पार्टीत पिवळ्या साडीत तरुणीचा जबरदस्त डान्स. अदाकारी आणि डान्स स्टेप पाहून ऑफिसमधील सहकारीही झाले थक्क. VIDEO होतोय प्रचंड व्हायरल.

दिवाळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि जल्लोष आलाच. सणासुदीच्या काळात घरांपासून ते ऑफिसपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. विशेषतः कॉर्पोरेट ऑफिसमधील दिवाळी पार्टीची रंगत काही वेगळीच असते. अशाच एका ऑफिसमधील दिवाळी पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पिवळ्या साडीत एका तरुणीने आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पिवळ्या साडीत देसी अंदाज, डान्सने जिंकली मनं
व्हायरल व्हिडिओमध्ये दिवाळीनिमित्त एका ऑफिसची आकर्षक सजावट करण्यात आल्याचे दिसते. रंगीबेरंगी कंदील, झुंबर आणि सजावटीच्या वस्तूंनी संपूर्ण ऑफिस परिसर उजळून निघाला आहे. याच उत्सवी वातावरणात पिवळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केलेली एक तरुणी डान्स फ्लोअरवर येते.
यानंतर ती आपल्या दमदार डान्स स्टेप आणि सुंदर हावभावांनी उपस्थितांची मने जिंकते. तिचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरील हास्य आणि ठसकेबाज नृत्य पाहून ऑफिसमधील सहकारीही उत्साहाने टाळ्या वाजवताना आणि शिट्ट्या मारताना दिसतात.
सहकाऱ्यांनीही धरला उत्साहाचा सूर
या व्हिडिओमध्ये ऑफिसमधील इतर महिला सहकारीही पारंपरिक कपड्यांमध्ये तरुणीच्या डान्सला प्रोत्साहन देताना दिसतात. काही जणी मोबाईलमध्ये तिच्या डान्सचे व्हिडिओ शूट करत आहेत, तर काही जणी टाळ्या वाजवून तिचा उत्साह वाढवत आहेत. संपूर्ण ऑफिसमध्ये दिवाळी पार्टीचा आनंद आणि जल्लोष पाहायला मिळतो.
सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा
हा व्हिडिओ Instagram वरील frames_ofliving या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर झाल्यानंतर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जात आहे. नेटकरीही तरुणीच्या डान्सचे भरभरून कौतुक करत आहेत.
एका युजरने तिच्या डान्समधील ग्रेस आणि एक्स्प्रेशन्सचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या युजरने, आमच्या ऑफिसमध्ये अशी दिवाळी पार्टी कधीच होत नाही, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. आणखी एका युजरने साडी नेसून इतक्या सहजपणे डान्स करणे सोपे नसल्याचे म्हणत तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले.
View this post on Instagram
दरम्यान, दिवाळी पार्टीतील या तरुणीच्या भन्नाट डान्सने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. तिचा देसी अंदाज आणि आत्मविश्वासपूर्ण डान्स पाहून नेटकरीही या व्हिडिओवर पसंतीची मोहोर उमटवत आहेत.
