10 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
ऑक्टोबर महिना आला उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. त्यामुळे घाम येणे, थकावा जाणवणे,शरीरातील पाण्याची कमतरता होण्याचा धोका वाढतो.त्यामुळे पुरेसे पाणी पिण्यासोबतही काही आरोग्यदायी पेयांचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
नारळपाणी नारळपाणी शरीराला पाणी आणि पोटॅशियमसारखी खनिजे मिळवून देतं. उन्हातून घरी आल्यानंतर किंवा थकवा जाणवत असताना हा एक चांगला पर्याय आहे.
लिंबूपाणी साध्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून तयार केलेलं लिंबूपाणी शरीराला द्रवपदार्थ मिळवून देतं.त्यात साखर घालण्याऐवजी न साखर घालता पिणं चांगलं आहे.
कोकम सरबत आंबट - गोड आणि थंड कोकम सरबत शरीराला गरमीपासून आराम देतं आणि उन्हात पित्ताचा होणार त्रास कमी करतं
ताक ताक पिताना नुसते पिऊ नये त्यात काळे मीठ, जिरेपूड, हिंग टाकावे यामुळे तोंडाला चव येते. शरीर डिहायड्रेटेड आणि डिटॉक्स राहते.
सत्तूचं पेयं भाजलेल्या हरभऱ्याच्या पिठापासून तयार होणाऱ्या सत्तूच्या पेयातून प्रथिने आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यात पाणी,जिरे आणि लिंबाचा रस टाकून चव वाढवता येते.
संत्र्याचा ताजा रस संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं.त्यामुळे गरमीत हा रस प्यायल्याने शरीराला त्वरीत एनर्जी मिळते. संत्र हा नैसर्गिक एनर्जी बू्स्टर आहे.