कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो का?  

27 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

पिकलेल्या पिवळ्या केळ्यांप्रमाणेच हिरवी कच्ची केळीही आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

कारण हिरव्या केळीमध्ये साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असून पचनास ती योग्य मानली जाते.

कच्ची केळी खाल्ल्याने आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना पोषण मिळते आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

तसेच, त्यातील तंतुमय घटकांमुळे मलविसर्जन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

कच्च्या केळीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी ही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.