08 झून 2026
Created By: Soneshwar Patil
यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पावसाळी पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
पण अनेकांना माहिती नाही की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या गावात पडतो?
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
सावंतवाडीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वसलेले आंबोली हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.
पावसाळ्यात येथे उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे, दाट धुके आणि हिरवाईने नटलेले डोंगर पर्यटकांना आकर्षित करतात.
त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आंबोलीला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.