मुलाची मुलगी कशी झाली? अनाया बांगरने सांगितली ती गोष्ट...
22 April 2025
Created By : Manasi Mande
मुलगा असताना जेंडर चेंज ऑपरेशन करून मुलगी बनलेली अनाया बांगर सध्या चर्चेत आहे. तिने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले.
मुलगा ते मुलगी बनणे या प्रवासाबद्दलही ती स्पष्ट बोलली. जेंडर चेंजबद्दलही तिने बरीच माहिती दिली.
एखादी व्यक्ती, मुलगा नाही हे कधी समजायला लागतं याबद्दलही ती बोलली.
प्रत्येकासाठी हा वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वेग-वेगळ्या वयात याबद्दल समजू शकतं.
माझ्याबद्दल सांगायचं झालं तर 9-10 वर्षांची असताना मला हे जाणवलं, असं अनाया बांगर म्हणाली.
मी 9 वर्षांची होते, तेव्हा लपून-छपून आईच्या कपाटातून तिचे कपडे घ्यायचे आणि ते घालून पहायचे.
ते कपडे घालून, मुलीसारखं राहून मला छान वाटायचं, ते आवडायचं.
त्यावेळी मला वाटायचं की मला मुलगी बनायचं आहे, असं अनाया म्हणाली.
पीरियड्स येतात की नाही ? अनाया बांगरने स्पष्टच सांगितलं…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा