पीरियड्स येतात की नाही ? अनाया बांगरने स्पष्टच सांगितलं...

18 April 2025

Created By : Manasi Mande

मासिक पाळी, ही पीरियड्स नावानेही ओळखली जाते, प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असते.

पीरियड्सचं सायकल साधारण 28 दिवसांचं असतं, त्या दरम्यान महिलांना वेदना, ब्लीडिंग, क्रॅम्प्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

क्रिकेट कोच संजय बांगर यांचा मुलगा आर्यनने जेंडर ट्रांझिशन केलं असून आता तो मुलगी बनलाय. ती अनाया बांगर नावाने प्रसिद्ध आहे.

नुकतीच तिने लल्लनटॉपला मुलाखत दिली. तिला पीरियड्स येतात का  ? त्यावर अनाया स्पष्टच बोलली.

आम्हा ट्रान्सवुमनना पीरियड्स येत नाहीत कारण आम्हाला ओव्हरी आणि यूट्रस नसतं.

तसेच प्रेग्नंट होण्यासाठी किंवा पीरियड्स येण्यासाठी आम्ही कोणतही ऑपेरशनही करून घेऊ शकत नाही.

फक्त हॉर्मोन थेरपी असते, ज्यामुळे जे बदल होतात ते राहतात, असं अनाया म्हणाली.

अँग्झायटी, भुकेत बदल, थकवा, कमजोर वाटणं अशी लक्षणं दर महिन्यात महिलांना दिसतात, तीच लक्षणं ट्रान्सवुमनमध्येही दिसतात.