शॉपिंग बॅग ब्राऊन रंगाच्याच का असतात ?

2 June 2025

Created By : Manasi Mande

शॉपिंग करताना दुकानात तुम्ही ब्राऊन बॅग्स पाहिल्या असतीलच.(photo : Social media)

आता तर ई-कॉमर्स कंपनियासुद्धा ब्राऊन बॉक्समध्ये डिलीव्हरी करतात.

मग शॉपिंग बॅग ते पार्सल बॉक्स पर्यंत सगळंच ब्राऊन रंगाचं का असतं ?

खरंतर शॉपिंग बॅग आणि कुरिअर बॉक्स कॉरूगेटेड असतात, जे पेपरचे असतात.

नॅचरल (नैसर्गिक) पेपर ब्लीच करत नाहीत, त्यामुळे तो ब्राऊन असतो.

त्यावर काही लिहीता येत नाही, त्यामुळे तो पांढरा (पेपर) करण्यात वेळ वाया घालवत नाहीत.

ई-कॉमर्स कंपन्यांचे पार्सल बॉक्स रिसायकल मटेरियलचा वापर करून बनवतात.

त्यामध्ये वर्तमानपत्र, धान्याचे पेपरबोर्ड पॅक आणि ज्यूसचे डबे यांचा समावेश असतो.

आपल्याला मिळणारा ब्राऊन बॉक्स हा बेसिक यूजनंतर पुन्हा वापरण्यासाठी तयार केला जातो.