महाशिवरात्री निमित्त 300 वर्षानंतर दुर्मीळ योग... काय आहे महत्त्व ?
08 March 2024
Created By : Manasi Mande
आज महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक नामस्मरणात दंग आहेत. शिवभक्तांसाठी हा दिवस खूप खास.
भोलेनाथाची पूजा, उपासना करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ मानला गेला आहे.
महाशिवरात्रीचा हा दिवस भक्त-भाविक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
यावर्षी महाशिवरात्र खूप खास आहे कारण यादिवशी अनेक शुभ योग आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी 300 वर्षानंतर सर्वार्थ सिद्धि योग, शिवयोग, सिद्ध योग, लक्ष्मी योग आणि गजकेसरी योग यांचा संयोग आहे.
खरंतर चंद्र आणि गुरूच्या प्रबळ योगामुळे शुभ स्थिती होणार आहे, ज्याच्या संयोगामुळे गजकेसरी योग निर्माण होत आहे.
यामुळे कोणत्या राशींवर महादेवाचा आशिर्वाद राहील ते जाणून घेऊया.
गजकेसरी योग मिथुन राशीसाठी खास आहे. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे.
गजकेसरी योगमुळे वृश्चिक रास असलेल्या लोकांची आर्थिक स्थितीही उत्तम राहील. करिअरमध्येही चांगला लाभ होईल.
कुंभ रास ज्यांची आहे त्यांच्यासाठीही गजकेसरी योग शुभ मानला जातो. गुंतणुकीसाठी हा काळ उत्तम मानला जातो. नवीन कार्याची सुरूवात करू शकता.
CVV नंबर म्हणजे काय ? तो गोपनीय का असतो ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा