घरगुती गॅस सिलिंडर सुद्धा एक्सपायर होतो. एक्सपायर झालेले सिलिंडर गॅस भरल्यावर दबाव सहन करत नाही.
त्यामुळे सिलिंडरचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते, मोठ्या दुर्घटनेची शक्यता असते
सिलिंडरवर एक्सपायरी डेट असते, तीन पट्ट्यांमध्ये एक्सपायरीचा A-23, B-24 D असा कोड लिहिलेला असतो
A चा अर्थ जानेवारी ते मार्च, B चा एप्रिल ते जून, Cचा जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर
A,B,C वा D च्या पुढे जी संख्या असते ती म्हणजे वर्ष, उदा- C-2025 याचा अर्थ जुलै ते सप्टेंबर 2025 पर्यंत वैध
एलपीजी ग्राहकांना दुर्घटनेत जीवित वा वित्तहानी झाल्यास 50 लाखाचा क्लेम मिळू शकतो
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम वितरकांच्या माध्यमातून थर्ड पार्टी विमा देते. आयसीआयसीआय लोम्बार्डद्वारे विमा दिला जातो, पण एक्सपायरीवाला सिलिंडर वापरल्यास क्लेम होत नाही
दुर्घटना झाल्यास 30 दिवसात पोलीस आणि वितरकाला त्याची माहिती द्या
एफआयआर, मेडिकल रिपोर्ट, खर्चाचा तपशील आणि मृत्यू झाल्यास डेथ सर्टिफिकेट क्लेमसाठी द्यावं लागतं