जगात शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. असंख्य डिग्र्याही घेता येतात. पण काही कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते. (photos : freepik/social media )
वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवणं महाकठिण असतं, असं मानतात. मेडिकल शिक्षणासोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंग, इंटर्नशीप करावी लागते
यानंतर कायद्याची पदवी येते. यात संविधान, नियम, कायदे, केस स्टडिज आणि जजमेंटला समजून घ्यावं लागतं.
कायद्याच्या विद्यार्थ्याला खूप शिकावं लागतं. तर्क तसेच विश्लेषणाची सांगड घालून विचार करावा लागतो. लॉ करायला बराच वेळ जातो, वकील बनल्यावरही प्रॅक्टिस करावी लागते
वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चरमध्ये इमारत, ढाच्यांची डिझाईन, प्लानिंग आणि कन्स्ट्रक्शन शिकवलं जातं.
आर्किटेक्चरचं शिक्षण घेताना प्रोजेक्ट्स, मॉडल बनवणं आणि तांत्रिक ड्रॉइंग करावी लागते. यात संरचानात्मक आणि टेक्निकल गोष्टी असल्याने ही डिग्री घेणंही कठिण असतं
मॅथेमॅटिकल सायन्सची पदवी सुद्धा तशीच अत्यंत कठिण असते. यात गणित, सांख्यिकी आणि अप्लाइड मेथडचं शिक्षण असतं.
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची डिग्रीही अत्यंत टफ असते. यात वीज, इलेक्ट्रॉनिक्स, सर्किट डिझाइन आणि टेलिकम्युनिकेशन्सचा अभ्यास असतो
या सर्व पदव्या अत्यंत कठिण असतात, त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावरच सोडतात