श्रावणात केस कापले तर काय होतं  ?

19 July 2025

Created By : Manasi Mande

श्रावण महिन्यात केस किंवा नखं कापू नये असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण या महिन्यात केस कापले तर काय होतं ?

धार्मिक दृष्टीकोनातून श्रावणात केस कापणं योग्य मानलं जात नाही, कारण हा संपूर्ण महीना शंकराला समर्पित असतो.

श्रावणात ज्यांचं व्रत असतं त्यांनी केस, नखं कापू नयेत, दाढी करू नये असं म्हटलं जातं. नाहीतर व्रत निष्फळ ठरतं.

धार्मिक मान्यतेनुसार, हा महीना शंकराला समर्पित असतो, त्यामुळे या महिन्यात केस वा नखं कापणं वर्ज्य असतं.

श्रावणात शंकराची आराधना, जप यावर लक्ष केंद्रित करायचं असतं, केस कापल्याने लक्ष विचलित होऊ शकतं.

तसेच या महिन्यात नखं वा केस कापल्याने नकारात्मक उर्जा आकर्षित होऊ शकते, असे काही लोक मानतात.