धनलाभासाठी अनेक लोकं ज्योतिष आणि वास्तूशास्त्राशी निगडीत उपाय करतात. तर काहीजण पर्समध्ये विशेष वस्तूही ठेवतात.
हिंदू धर्मात तुळस शुभ मानली जाते. या रोपात लक्ष्मीचा वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे ती विष्णूंनाही प्रिय आहे.
तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीने त्रस्त असाल, तर तुम्हीही लाल कापडात तुळशीची पाने बांधून पर्समध्ये ठेवली पाहिजे.
जर तुमच्यावर खूप वर्षांपासून कर्ज असेल तर पर्समध्ये तुळशीची ताजी पानं ठेवा. असं केल्यान लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात आणि कर्जातून लवकर मुक्तता होते.
तुमची कामं नीट होत नसतील, त्यात अडचण येत असेल तर पर्समध्ये तुळशीची पानं ठेवा. त्यामुळे थांबलेलं काम पूर्ण होतं, प्रगतीची दारं उघडतात.
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीचं रोप लावल्याने घरात सकारात्मक उर्जा येते, तसंच पर्समध्ये तुळशीची पानं ठेवल्याने सकारात्मकता वाढते, जीवनात सुख-समृद्धी येते.