पुष्कराज रत्न घातल्याने काय होतं ? या राशींसाठी खूपच फायदेशीर

2 June 2025

Created By : Manasi Mande

ज्योतिषशास्त्रात पुष्कराज हे महत्वाचं आणि शुभं रत्न मानलं जातं,ते गुरूचे प्रतिनिधित्व करतं.

पुष्कराज रत्न धारण केल्याने बुद्धी प्रखर होते,  निर्णयक्षमता आणि ज्ञानही वाढतं.

हे रत्न धनाच्या आगमनाचे रस्ते उघडतं, आर्थिक स्थिती मजबूत करतं आणि व्यापरात लाभ मिळवून देतं. पुष्कराज रत्नामुळे व्यक्तीचं भाग्य उजळतं.

अविवाहीत मुलींच्या लग्नात येणारा अडथळा दूर करतं आणि लग्नाचा योग लौकर येतो. वैवाहिक जीवनात सुख, शांति आणि सामंजस्य आणतं.

ज्यांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, त्यांनी पुष्कराज धारण करणं शुभं मानलं जातं.

धनू राशीचे स्वामी बृहस्पती आहेत. त्यामुळे धनू राशी असलेल्यांसाठी पुष्कराज अत्यंत शुभ व फलदायी असतं.

धनूव्यतिरिक्त मेष, सिंह, वृश्चिक, मीन राशीसाठीही पुष्कराज रत्न शुभ असतं. त्यांना करिअरमध्ये लवकर यश मिळतं आणि धनाची कमी दूर होते.