Monsoon Tips : पावसाळ्यात खिडकी आणि दरवाजे जाम होतात ? हे उपाय करा

07 August 2025 

Created By : Manasi Mande

पाऊस सुरू झाल्यावर अनेक समस्याही निर्माण होतात, खिडकी आणि दरवाजे जाम होणं हे त्यापैकीच एक.

पाण्यात भिजल्याने दरवाजे आणि खिडक्यांचे तावदान फुगते

त्यामुळे ते बंद होत नाहीत, परिणामी डोक्याला ताप होतो

अशावेळी दरवाजे किंवा खिडक्या मेणबत्तीने चांगले घासा

मेणबत्ती तेलकट असल्याने दरवाज्याची उघडझाप सहज होते

जाम झालेल्या दरवाजा आणि खिडक्यांचा आवाज येतो

बिजागिरीच्या ठिकाणी मोहरीचं तेल लावा, आवाज बंद होईल

पावसाळ्यात दरवाजे आणि खिडक्या सताड उघड्या ठेवू नका

अनेकदा लोखंडाचे दरवाजेही जाम होतात, तेव्हा सँड पेपरचा वापर करा