मुंबई की दिल्ली ? देशातलं सर्वांत महाग शहर कोणतं ?

17 june 2024

Created By :  Manasi Mande

महागाईच्या या काळात अनेक लोकं पैसे कमावण्यासाठी छोट्या गावा-शहरातून निघून मोठ्या शहरांचा रस्ता पकडतात.

पण मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरात राहणं हे खूप खर्चिक आहे.

Mercer 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेच्या आधारे एका रिपोर्टमध्ये देशातील सर्वात महाग शहरांची लिस्ट शेअर करण्यात आली आहे.

स्वप्नांचं शहर असलेलं मुंबई हे हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंगमुळे अनेकांना परवडत नाही.

या रिपोर्टनुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडं शहर आहे. रिअल इस्टेट, ट्रान्स्पोर्ट, घरभाडं सगळ्याचे भाव इथे चढेच आहेत.

जागतिक स्तरावरही मुंबई या वर्षी 136 व्या स्थानावर आहे.

देशाची राजधानी दिल्ली हे भारतातील दुसऱ्या नंबरचं महागडं शहर आहे आणि जागतिक स्तरावर ते 164 व्या स्थानी आहे.

 प्रवाशांसाठी मुंबई हे आशियातील 21वं सर्वांत महाग शहर आहे तर या यादीत दिल्ली हे 30 व्या क्रमांकावर आहे.

इतर महाग शहरांमध्ये चेन्नई  189 व्या स्थानी, बंगळुरू 195 व्या क्रमांकावर तर हैदराबाद हे 202 व्या स्थानी आहे.

या यादीत पुण्याचा क्रमांकही असून ते 205  व्या स्थानी तर कलकत्ता हे 207 व्या स्थानी आहे.