माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही असतात राशी? त्या कोणत्या असताता वाचा

30 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

ज्योतिषशास्त्रानुसार माणसाप्रमाणेच पाळीव प्राण्यांची जन्मतारीख आणि वेळ जाणून रास काढता येते.

याला पेट ॲस्ट्रॉलॉजी असे म्हंटले जाते. माणसाप्रमाणेच प्राण्यांच्याही 12 राशी असतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन.

मेष राशीचे  प्राणी उत्साही, धाडसी, खेळकर स्वभावाचे असून नेहमीच पुढे राहण्याची प्रवृत्ती दाखवतात.

मेष

वृषभ राशीचे प्राणी शांत, खादाड, सुस्त आणि घरात एकाच जागी विश्रांती घेणे पसंत करणारे असतात.

वृषभ

मिथून राशीचे  प्राणी अत्यंत जिज्ञासू, चपळ आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची आवड असणारे असतात.

मिथून

कर्क राशीचे प्राणी आपल्या मालकाशी भावनिकपणे जोडलेले, लाजाळू आणि जास्त प्रेम-काळजी मागणारे असतात.

कर्क

या राशीचे प्राणी रुबाबदार, गर्विष्ठ आणि घरातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारे असतात, ते स्वतःला राजा समजतात.

सिंह

कन्या राशीचे प्राणी शिस्तप्रिय व स्वच्छताप्रिय असतात, तर तूळ राशीचे प्राणी मैत्रीपूर्ण व शांत स्वभावाचे असतात.

कन्या व तूळ

वृश्चिक राशीचे प्राणी मालकाशी अत्यंत एकनिष्ठ पण अनोळख्यांबद्दल संशयी असतात, तर धनु राशीचे प्राणी भटके व साहसी असतात.

वृश्चिक व धनु

मकर राशीचे प्राणी आज्ञाधारक, कुंभ राशीचे स्वतंत्र व वेगळ्या स्वभावाचे, तर मीन राशीचे अत्यंत संवेदनशील आणि अंतर्ज्ञानी असतात.

मकर, कुंभ व मीन