कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात ?

3 May 2025

Created By : Manasi Mande

केस पांढरे होण्याचा त्रास अनेकांना सतावतो. शरीरात एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असणे हे त्याचे मुख्य कारण असू शकते.

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असते तेव्हा केसांच्या मुळाशी असलेलं मेानोसाइट्स कमी होतं. त्यामुळे मेलानिन कमी बनतं आणि केस पांढरे होऊ लागतात.

व्हिटॅमिन डी फक्त हाडांसाठीच नाही तर केसांची वाढ आणि रंगासाठीही महत्वाचे असते. त्याच्या कमतरतेमुळे केस गळणं आणि पांढरे होणं सुरू होऊ शकतं.

व्हिटॅमिन ई आणि सी हे दोन्ही अँटीऑक्सीडेंट म्हणून काम करतात. ते कमी झाल्यास स्काल्पवरील सेल्स म्हातारे होऊ लागतात आणि वेळेपूर्वीच केस पांढरे होण्याची समस्या जाणवते.

 व्हिटॅमिन B9 हे सेल्स आणि मेलानिनच्या निर्मितीत मदत करतं. त्याच्या कमतरतेमुळे केसांचे पोषण कमी होतं. आणि केस पांढरे होतात.

टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवनने अखेर सोफी शाईनसोबतचं त्याचं नातं जाहीररित्या कबूल केलं.

वेळोवेळी व्हिटॅमिन लेव्हल तपासा , कमी आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स घ्या.