टोमॅटो हे भाजी आहे की फळ ? अनेकांना माहीतच नाही योग्य उत्तर
20 June 2025
Created By : Manasi Mande
स्वयंपाकादरम्यान बहुतांश घरात आमटी किंवा भाजी तर केलीच जाते.
काही भाज्यांमध्ये टोमॅटो वापरल्याने त्याची चव आणखी वाढते.
टोमॅटोचा उपयोग सलाड म्हणूनही केला जातो. त्यामुळे त्याचं महत्वही वाढतं.
पण टोमॅटो हे फळ आहे की भाजी, असा प्रश्न अनेकांना पडतो.
फळाची ओळख म्हणजे बी असणं आणि झाडातून फूल उगवणं हे त्यात सामील असतं.
टोमॅटोमध्ये बिया असतात आणि तो रोपांच्या फुलांमधून उगवतो, म्हणून टोमॅटो हे फळ मानलं जातं.
पण तरीही साधारणत: टोमॅटोचा उपयोग भाजी, सलाड आणि पिझ्झासारख्या इतर डिशेसमध्ये केला जातो.
त्यामुळे बहुतांश लोकं हे टोमॅटोला भाजी समजण्याची चूक करतात, पण खरंतर ते एक फळ आहे.
डेझर्ट आणि मिठाई मध्ये फरक काय ? अनेकांना हे माहीतच नसेल..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा