डेझर्ट आणि मिठाई मध्ये फरक काय ? अनेकांना हे माहीतच नसेल..
19 June 2025
Created By : Manasi Mande
आपण बरेचदा गोड पदार्थांसाठी कधी डेझर्ट तर कधी मिठाई असा शब्द वापरतो. पण दोन्हींमध्ये फरक आहे.
हे पदार्थ खाण्याच्या वेळा आणि इतर गोष्टींमुळे डेझर्ट आणि स्वीटमध्ये फरक असतो.
डेझर्ट म्हणजे जे गोड पदार्थ जेवण जेवल्यावर खाल्ले जातात. त्याला final course of meal असं म्हटलं जातं.
साधारणत: डेझर्टमध्ये केक, पेस्ट्री, आईस्क्रीम आणि फ्रूट टार्टचा समावेश असतो.
तर मिठाई ही फक्त जेवणाच्या शेवटी नव्हे तर कधीही खाल्ली जाते. डेझर्ट आणि मिठाई, दोन्ही गोड असल्याने गोंधळ होतो.
डेझर्ट हे सहसा गोड असतं, पण मिठाईला कधीच डेझर्टच्या कॅटॅगरीत धरलं जात नाही. उदा - रसगुल्ला, गुलबाजाम..
डेझर्ट असो की मिठाई, त्यांचा मूळ उद्देश हा जेवल्यानंतर काह गोड खाण्याची इच्छा शांत करणे हाच आहे.
जांभळाच्या बिया खाल्ल्याने काय फायदा मिळतो ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा