फुटबॉलची 28 रत्नं... ऑस्ट्रियातून ट्रेनिंग पूर्ण करून भारतात परतले फुटबॉलर्स

8 April 2025

Created By : Manasi Mande

टीव्ही 9 नेटवर्कच्या "इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस" मोहिमेअंतर्गत 28 प्रतिभावान भारतीय फुटबॉलर्सने जगाला आपल्या प्रतिभेची झलक दाखवली.

हे सर्वजण ऑस्ट्रियाच्या गमुंडेनमध्ये एका आठवड्याचं फुटबॉल ट्रेनिंग पूर्ण करून भारतात परतले आहेत.

सोमवारी दिल्लीमध्ये या युवा फुटबॉल चॅम्पियन्सचं ऑस्ट्रियाच्या राजदूत  कॅथरीना व्हिसर यांनी स्वागत केलं.

ऑस्ट्रियाच्या राजदूतांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या "इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस" या मोहिमेचं कौतुक केलं.

टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास म्हणाले, भारतीय संघाने एक दिवस फुटबॉल वर्ल्डकप जिंकावा असं संपूर्ण देशाचं आणि माझं स्वप्न आहे.

भारतात बरीच प्रतिभा आहे. फक्त ती ओळखणं आणि विश्वस्तरावरील मानकांवर ती खरी ठरणे गरजेचं आहे.

TV9 नेटवर्क हे आयएफसी आणि ऑस्ट्रियाच्या रीस्पोसह त्यांच्या जागतिक भागीदारांच्या सहकार्याने हे करण्यास वचनबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केलं.