Raksha Bandhan 2025 :  रक्षा बंधनला बहिणीला चुकूनही हे गिफ्ट देऊ नका

05 August 2025 

Created By : Manasi Mande

रक्षा बंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला. आपल्या लाडक्या भावा-बहिणीला भेटवस्तू देऊन हा सण साजरा करा.

पण अशा काही गोष्टी असतात ज्या गिफ्ट दिल्याने दुर्भाग्य येऊ शकते किंवा नात्यांमध्ये दुरावा वाढतो, असं मानलं जातं.

ज्योतिष किंवा वास्तूशास्त्रानुसार, काही गोष्टी भेट म्हणून देणे टाळावे. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया.

काचेच्या वस्तू गिफ्ट म्हणून देणं हे अशुभ मानलं जातं.

गिफ्ट म्हणून एखाद्याला घड्याळ भेट देणं हेही चांगल मानलं जात नाही.

सुरी किंवा कात्रीसारख्या धारदार वस्तूदेखील भेट म्हणून देऊ नयेत.   

काळा रंग अशुभ मानला जात असल्यामुळे त्या रंगाचे कपडेही कोणालाच भेट देऊ नयेत.

काळ्या रंगामुळे नकारात्मकता येते असं मानलं जातं, म्हणून हां रंग भेट देणं टाळावं.