Independence Day : तिरंग्यातील अशोकचक्रात किती आरे असतात ? तुम्हाला माहीत आहे का योग्य उत्तर ?
13 August 2025
Created By : Manasi Mande
प्रत्येक देशाचा एक राष्ट्रीय ध्वज असतो. ध्वजाच्य रंगापासून ते त्यातील चिन्हापर्यंत प्रत्येकाचा एक अर्थ असतो, जसा भारताचा तिरंगा.
तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, स्वातंत्र्यापूर्वी काही दिवस आधी 22 जुलै 1947 साली संविधान सभेच्या बैठकीत या ध्वजाला मंजुरी देण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय ध्वजात सर्वात वरती केशरी रंग, मध्यभागी पांढरा तर सर्वात खाली हिरवा रंग असतो.
केशरी रंग हा शक्ती आणि साहस यांचे प्रतीक आहे तर पांढरा हा शांति आणि सत्याचे व हिरवा रंग हा प्रगती आणि शुभतेचे प्रतीक असतो.
तिरंग्यात मध्यभागी असलेले चक्र हे मौर्य सम्राट अशोक द्वारे बनवण्यात आलेल्या सारनाथ सिंह स्तंभातील 'विधि चक्र' दर्शवतो.
या चक्रात 24 आरे असतात जे धर्मचक्र, न्याय आणि सतत गतीचे प्रतीक आहे. गतीमध्ये जीवन आहे, हेच हे चक्र दर्शवतं.
तिरंगा हा कोणत्याही पद्धतीने बनवता येत नाही, त्याचा आकार निश्चित आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर 2:3 आहे.
दुबईमध्ये 1 पोळी किती रुपयांना मिळते ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा