उडदाची डाळ कोणी खाऊ नये ? 

07 January 2025

Created By : Manasi Mande

उडदाच्या डाळीचे अनेक पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा, वडा हे पदार्थ तर खूप लोकप्रिय आहेत.( Getty Images)

पण उडीद डाळ सर्वांनाच पचेल अस नाही. काही लोकांनी ती खाणं टाळावं, कोणी खाऊ नये उडदाची डाळ ?

ज्यांना गॅसेस, ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो त्यांनी ही डाळ टाळावी.

ज्यांची पचनशक्ती चांगली नाही त्यांनीही उडीद डाळ खाऊ नये.

किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी उडीद डाळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्या लोकांना ॲलर्जी किंवा डाळीमुळे रॅशेस, खाज  असा त्रास होतो त्यांनीही उडीद डाळ टाळावी.

वजन वाढण्याची समस्या असल्यास त्या लोकांनी उडीद डाळ प्रमाणातच खावी.

सर्दी, खोकला किंवा कफ झाला असल्यास उडीद डाळीचे पदार्थ खाल्ल्याने त्रास वाढतो.

जर उडीद डाळ खायची असेल तर ती नीट भिजवून, त्या पदार्थात हिंग, आलं वगैरे टाकून खावे.