मुघल बादशहांच्या जेवणात रोज थोडं-थोडं विष का दिलं जायचं? जाणून घ्या चकित करणारं कारण

02 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

मुघल बादशहांना सत्तेच्या हव्यासापोटी अन्नातून विष देण्याचा धोका सतत असायचा.

त्यापासून बचावासाठी लहानपणापासून सूक्ष्म प्रमाणात विष देऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवली जात असे, ज्याला मिथ्रिडेंटिझम म्हणतात.

भारतात हीच पद्धत विषपुरुष किंवा विषकन्या तयार करण्यासाठी प्राचीन काळापासून वापरली जात होती.

1526 च्या पानिपत लढाईनंतर इब्राहिम लोधीच्या आईने बाबराच्या अन्नात विष घातल्याने तो थोडक्यात बचावला आणि मुघल घराण्यात कडक नियम लागू झाले.

अकबराच्या काळात माजून नावाचा अर्क दिला जाई, तर जहांगीर अफू-मद्यामुळे विषाला सरावला होता.

गुजरातचा सुलतान महमूद बेगडा पूर्ण विषपुरुष बनला होता आणि हकीम बेझोअर स्टोन व सेलाडॉन भांडी वापरत.

मीर बकावल स्वयंपाकघरावर नियंत्रण ठेवत, अन्नाची तपासणी प्राण्यांवर व स्वतः चाखून करत असे.