रात्री ट्रेनमधून करताय प्रवास ? हे नियम जाणून घ्या
13 November 2023
Created By : Manasi Mande
भारतीय रेल्वेतर्फे प्रवासांच्या सुरक्षेसाठी नवे नियम बनवण्यात येतात. पण प्रवाशांना नियम माहीत नसले तर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
रात्री ट्रेनमधून प्रवास करताना, काही नियमांचे पालन करावे लागते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
कोणताही प्रवासी सीटवर, डब्यात किंवा कोचमध्ये मोठ्याने मोबाईलवर बोलू शकत नाही. ईअरफोन लावल्याशिवाय मोठ्याने गाणी ऐकू शकत नाही.
रात्री 10 नंतर कोणत्याही प्रवाशाला लाइट सुरू ठेवण्याची परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
तसेच ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान करण्यास तसेच कोणतीही ज्वलनशील वस्तू नेण्यास बंदी आहे
रात्री 10 नंतर टीसी हे लोकांचे तिकीट चेक करण्यास येऊ शकत नाहीत. पण तुमचा प्रवास रात्रीच सुरू झाला, तर हा नियम लागू होत नाही.
ग्रुपने प्रवास करणारे प्रवासी रात्री 10नंतर गप्पा मारू शकत नाहीत.
तसेच ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण रात्री 10 नंतर सर्व्ह केलं जात नाही.
दिवाळीत इतकी सोनपापडी का दिली जाते ? जाणून घ्या इतिहास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा