गुळातील भेसळ कशी ओळखायची ? हे सोपे उपाय करूनच पहा..

30 June 2025

Created By : Manasi Mande

रोजच्या आहारात, भाजी आमटीत आपण गूळ वापरतोच. लोहासाठी गूळ खाणं महत्वाचं मानलं जातं. त्यात अनेक पोषक गुणधर्म असतात.

बहुतांश घरात जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ला जातो. अनेक पदार्थांत त्याचा वापरही होतो. पण आजकाल गुळातही भेसळ होते. ती  कशी ओळखायची ?

गूळ थोडा पाण्यात मिसळा. त्यात भेसळ असेल तर अशुद्धता पाण्यात मिसळेल. पाण्यात टाकल्यावर दुधी रंग दिसला तर समजा गूळ भेसळयुक्त आहे.

गूळ गरम केल्यास कॅरेमलसारखा वास येतो , चिकट होतो आणि हळू वितळतो. त्यात भेसळ असेल तर तो पटापट वितळतो आणि पाक पातळ होतो.

गूळ खाल्ल्यावर जीभेवर साखरेसारखी चव आली तर समजा त्यात भेसळ आहे.

शुद्ध गूळ हा हलक्या  पिवळ्या रंगाचा असतो. पण भेसळयुक्त गुळाचा रंग खूप डार्क असतो. त्यावर डाग असतील तर विकत घेऊ नका.

भेसळयुक्त गूळ खूप चमकदार असतो. हातावर घासून तो चेक करून पाहू शकता.