बदाम, पिस्ता आणि काजू हे ड्रायफ्रुट्स नाहीत, यांचं खरं नाव माहितीये का?

21 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

भारतीय लोक बदाम, पिस्ता आणि काजूला शक्यतो ड्रायफ्रुट्स हा शब्द वापरतात. पण हे विज्ञानाच्या भाषेत चुकीचं नाव आहे

विज्ञान सांगतं की, ड्रायफ्रूट हा शब्द अशा फळांसाठी वापरला जातो ज्यांचे पाणी वाळवून त्यांचा साठा केला जातो

सुक्या फळांना सुका मेवा म्हणतात. उदाहरणार्थ, द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात, म्हणून ते एक कोरडं फळ आहे

खऱ्या अर्थाने, मनुका, खजूर, आणि अंजीर हे सुक्या मेव्याच्या श्रेणीत ठेवले जातात. बदाम आणि पिस्ता नाही

विज्ञानाच्या भाषेत बदामांना ड्यूप म्हणतात. ड्यूप हा शब्द अशा फळासाठी वापरला जातो ज्याचा बाह्य थर कठीण असतो

बदाम, पिस्ता आणि काजूची फळे बाहेरून कठीण असतात आणि ते त्यांच्या आत बियांच्या स्वरूपात असतात. म्हणूनच त्यांना ड्यूप म्हणतात.

विज्ञानात, फळांची नावे त्यांच्या संरचनेनुसार दिली जातात. जसे ड्रायफ्रुट्स आणि ड्यूप