हिवाळ्यात त्वचेसाठी 'हे' पदार्थ वापरल्यास वाढेल कोरडेपणा (photo : freepik)

18 November 2023

Created By : Manasi Mande

हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा जास्त वाढतो. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट वापरताना विचार करावा.

त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी बरेच उपाय केले जातात. पण हिवाळ्याच्या दिवसात काही गोष्टी वापरल्याने कोरडेपणा वाढू शकतो.

हिवाळ्यात त्वचेसाठी लिंबाचा वापर करू नये, त्यातील सायट्रिक ॲसिडमुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो.

 थंडीच्या दिवसात स्क्रबिंग जास्त केल्याने त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे 15 दिवसांचे अंतर ठेवा आणि मॉयश्चरायझर नक्की वापरा.

आजकाल त्वचेसाठी तांदळाचे पीठ वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे, पण हिवाळ्याता याचा वापर टाळावा.

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि इंस्टंट ग्लो साठी बरेच जण बटाट्याचा वापर करतात.

पण बटाट्यामधील स्टार्चमुळे थंडीच्या दिवसात त्वचा  ड्राय होऊ शकते.