फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा, नवरा-बायकोमध्ये कधीच होणार नाही भांडण

11 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

प्रत्येकाला सुखी आणि शांत वैवाहिक जीवन हवे असते. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात पती-पत्नीमध्ये छोट्या कारणांवरून वाद होणे सामान्य झाले आहे.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये संसार सुखी ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे गुण सांगितले आहेत.

चाणक्य यांच्या मते, नात्यात संयम, एकमेकांचा आदर आणि प्रामाणिकपणा असणे अत्यंत गरजेचे आहे.

एखादा जोडीदार रागात असताना दुसऱ्याने शांत राहून परिस्थिती हाताळली, तर वाद वाढत नाहीत.

तसेच, एकमेकांच्या विचारांचा आणि स्वभावाचा सन्मान केल्याने नात्यात विश्वास आणि समज वाढते.

याशिवाय, इतरांशी तुलना न करता आपल्या परिस्थितीत समाधानी राहणे हे सुखी संसाराचे गमक असल्याचे चाणक्य यांनी सांगितले आहे.

(Disclaimer – ही माहिती चाणक्य नीती आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित असून केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे.)