कलिंगडाच्या बिया भाजून खाण्याचे फायदे माहितीयेत?

11 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जस्त आणि निरोगी फॅट्स भरपूर असतात जे हृदयासाठी चांगले असतात

कलिंगडाच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात

या बियांमध्ये प्रथिने भरपूर असतात जी शरीराच्या उर्जेसाठी आवश्यक असतात

कलिंगडाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते

कलिंगडाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात जे त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवतात

केसांना मजबूत करतात आणि वाढही झपाट्याने होते

बिया भाजून त्यांची पावडर बनवून दूध, आईस्क्रीम किंवा दह्यात मिसळू खाऊ शकता

कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरीज देखील जास्त असतात, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खाणेच योग्य