07 झून 2026
Created By: Soneshwar Patil
आजच्या काळात एखाद्या व्यक्तीचा स्वभाव केवळ चेहरा पाहून ओळखणे कठीण झाले आहे.
अनेकदा काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच नाती जपतात. अशा मतलबी लोकांच्या काही सवयी सहज लक्षात येतात.
मतलबी लोक गरज असेल तेव्हाच संपर्क साधतात आणि काम झाल्यानंतर दूर राहतात. ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी मैत्री किंवा संबंध टिकवून ठेवतात.
अशा व्यक्ती इतरांसाठी वेळ काढत नाहीत, मात्र स्वतःचे काम साध्य करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत.
तसेच, वारंवार खोटे बोलणे आणि समोरच्याला भ्रमात ठेवणे ही त्यांची आणखी एक सामान्य सवय मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, अशा वर्तनाची वेळेत ओळख करून घेतल्यास अनावश्यक त्रास आणि फसवणूक टाळता येऊ शकते.