कंगना रानौतच्या फिटनेसचं रहस्य काय ?

27 March 2024

Created By : Manasi Mande

चित्रपटांनंतर कंगना रानौत आता लवकरच राजकारणात दिसेल. भाजपाकडून ती हिमाचलमधील मंडी येथून ती लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

दमदार अभिनयासोबत कंगना ही तिच्या फिटनेससाठी देखील प्रसिद्ध आहे.

फिट राहण्यासाठी कंगना नियमितपणे व्यायाम करते आणि काटेकोरपणे डाएटचेही पालन करते.

37 वर्षांची कंगना नियमितपणे कार्डिओ, लंजेस, पुशअप्स, पुलअप्स आणि स्क्वॉट्स करते.

मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी कंगना नियमितपणे मेडिटेशनही करते.

वर्कआऊटसोबत कंगना डाएटही काटेकोरपणे पाळते. शाकाहारी असलेली कंगना डाएटमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेते.

ड्राय फ्रुट्स स्मूदी आणि मध याशिवाय वरण , आमटी,  भाजी, पोळी यांचे सेवन करते. मात्र रात्रीचे जेवण ती अतिशय हलके ठेवते.