किती असेल तुमचं आयुष्य ? ही टेस्ट करून पहा

16 November 2023

Created By : Manasi Mande

दीर्घायुषी व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सध्या अकस्मात मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे. कोणती व्यक्ती, किती वर्ष जगेल हे सांगणं तसं कठीण आहे. 

पण तुमच्या लाइफस्टाइलच्या चॉईसनुसार, तुम्ही किती जगाल हे समजू शकतं असं एका संशोधनातून समोर आलं.

आयुष्य किती असेल यासाठी जी टेस्ट केली जाते त्याला  'सिट टू स्टँड टेस्ट'मध्ये म्हटले जाते. या टेस्टमुळे हार्ट हेल्थ, बॅलेन्सिंग , आणि पायाची ताकद समजू शकते.

यात फार काही करायचं नाही. फक्त मांडी घालून खाली बसा आणि कशाचाही आधार न घेता उभं रहायचा प्रयत्न करा.

तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय उठलात तर 10 पॉईंट्स मिळतील. पण हात, गुडघा, तळहात, एक हात किंवा गुडघा कशाचााही आधार घेऊन उठलात तर शरीराच्या प्रत्येक भागासाठी 1 पॉईंट कमी होत जाईल.

2012 साली झालेल्या या अभ्यासात 2002 लोकांनी भाग घेतला. त्यापैकी  159  लोकांना सर्वात कमी  (० ते ३) पॉईंट्स मिळाले, त्यांचा मृत्यू अभ्यास सुरू झाल्यापासून 6.3 वर्षांच्या आत झाला.

तर ज्यांना 8 पेक्षा कमी पॉईंट्स मिळाले त्यांना पढील सहा वर्षांच्या आत मृत्यूचा धोका दोन ते पाचपट अधिक होता.

2002 लोकांपैकी ज्यांना 10 पॉईंट्स मिळाले त्यापैकी फक्त 2 लोकांचा मृत्यू झाला.