मासिक पाळीदरम्यान प्रवास करताना, बॅगमध्ये 'या' वस्तू हव्याच

15 November 2023

Created By : Manasi Mande

मासिक पाळीदरम्यान प्रवास करणे हे जरा कठीण होऊ शकतं. त्यावेळी महिलांना थकवा, मूड स्विंग्स आणि क्रॅम्प्सचा सामना करावा लागतो.

त्यामुळे अशा वेळी प्रवास करायची वेळ आलीच तर बॅगेत काही वस्तू आवर्जून ठेवल्या पाहिजेत.  त्यामुळे प्रवास सुलभ होईल.

प्रवास करताना एक्स्ट्रा पॅड्स किंवा टँपोन नेहमीच सोबत ठेवा.

तसेच वेट वाईप्स आणि काही  कोरडे टिश्यू पेपरही बॅगेत आठवणीने ठेवावेत.

एखाद-दुसरी डिस्पोजेबल बॅग, वर्तमानपत्राचे कागद हेही अशावेळी बॅगेत भरून ठेवावेत.

मासिक पाळीदरम्यान क्रॅम्प्सचा, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलरही सोबत ठेवावी.

 मासिक पाळीदरम्यान शरीराला अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची बाटलीही सोबत ठेवावी.

पीरियड्सदरम्यान थकवा येतो, त्यामुळे आरामदायक कपडे घाला आणि एक्स्ट्रा कपडेही बॅगेत भरा.

तसेच बॅगेत नेहमीच सॅनिटायझर ठेवावे. त्यामुळे स्वच्छता राखणे सोपे होते.