सकाळी उठल्यानंतर जर तुमचा चेहरा सुजत असेल तर रात्री या गोष्टी खाणे थांबवा

19 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सकाळी उठताच जर तुम्हाला चेहऱ्यावर सूज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका

शरीरातील पाण्याचे असंतुलन, जास्त सोडियमयुक्त पदार्थ किंवा रात्री उशिरा खाल्लेल्या अन्नाचे लक्षण असू शकते

साखर शरीरात जळजळ वाढवते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाणे टाळा

रात्री झोपण्यापूर्वी पॅकेटमधील, प्रिझर्वेटिव्ह अन्न खाणे टाळा ज्यामुळे शरीरात सूज येऊ शकते

रात्री जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ शकते

रात्री जास्त भात किंवा पास्ता किंवा पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे

अल्कोहोल आणि कॉफी पिणे टाळावे,  डिहायड्रेशनमुळे त्वचेवर सूज आणि थकवा येऊ शकतो