सकाळी उठताच गार पाणी पिण्याचे तोटे

05 December 2023

Created By : Manasi Mande

बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या-उठल्या गार पाणी पिण्याची सवय असते. मात्र यामुळे नुकसान होऊ शकते.

हे पोटासाठी हानिकारक ठरते, यामुळे पाचन तंत्र बिघडू शकते.

सकाळी उठताच गार पाणी पिणे हे डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते.

गार पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

सकाळी उठताच गार पाणी प्यायल्याने हृदयावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सकाळी उठताच गार पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो, ते टाळावे.