या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या....... 

26 सप्टेंबर  2026

Created By: Bhakti Gothankar

सकाळच्या सवयी सकाळी उठल्यानंतर आपण नकळत काही अशी काम करतो. ज्याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. या ५ सवयी बदलल्यामुळे तुमची किडनी फेल होणार नाही.

सकाळी उठल्यावर पाणी न पिणे  ८ ते १० तासांच्या झोपेमुळे डिहायड्रेशन होत. त्यामुळे सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. थेट चहा किंवा कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशन आणखी वाढते.

लघवी धरून ठेवू नका सकाळी होणारी लघवी बराच वेळ धरून ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. वारंवार, दिर्घकाळ लघवी रोखून धरल्यामुळे मूत्राशयाच्या आणि किडनीच्या समस्या निर्माण होतात.

रिकाम्या पोटी पेनकिलर घेणे टाळा सकाळी अंग दुखत असेल आणि तुम्ही रिकाम्या पोटी स्वत:हून वारंवार पेनकिलर घेत असाल तर ही सवय किडनीली महागात पडू शकते. 

व्यायामानंतर पाणी न पिणे सकाळी व्यायाम करणं ही गोष्ट चांगली आहे. परंतु व्यायाम करून पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे किडनीपर्यंत योग्य प्रमाणात पाणी पोहोचत नाही. 

पॅकेड्स फूड्स खाणे सकाळी नाश्ता न करता पॅकेड फूड्स किंवा प्रक्रिया केलेले फूड्स खाणे धोकादायक आहे. प्रोटीन,फायबर आणि इतर पोषक घटकांनी भरपूर असलेला नाश्ता करणे गरजेचे आहे. 

टीप  वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी  समर्थनही देत नाही.. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधीत्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.