योगासनं करताना या गोष्टी बिलकूल विसरू नका
23 June 2025
Created By : Manasi Mande
नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. चांगल्या आरोग्यासाठी योगासनं करणं फायदेशीर ठरतं.
पण योगासनं करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजेच. आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
योगासनं करताना शांतता महत्वाची, त्यामुळे शांत व सकारात्मक जागी योग करा.
योगासनं करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही लगेच खाऊ नका. जेव्हा खाल तेव्हा हलका आहार घ्यावा.
तुमची
शारीरिक क्षमता असेल त्याप्रमाणेच योगासनं निवडा. उत्साहाच्या भरात अती करू नका, त्रास होऊ शकतो.
योग करताना श्वासोच्छ्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. ते अतिशय महत्वाचं आहे. योगासने केल्याने शरीर लवचिक होण्यास मदत होते.
कोणतीही योगासने करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेऊन, नीट शिकून ती करा. स्वत:च्या मनाने योगासने करू नका.
पुरेसे पाणी पिणे शरीरासाठी खूप आवश्यक असते.
योगासनांचा नियमितपणे सराव करणे गरजेचे आहे. त्यात सातत्य राखा.
टोमॅटो हे भाजी आहे की फळ ? जरा डोकं लावा… अनेकांना माहीतच नाही योग्य उत्तर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा