कच्चे दूध प्यावे की नाही? याबद्दल तज्ञ काय सांगतात?

11 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दूध हे एक परिपूर्ण अन्न मानले जाते कारण त्यात अनेक पोषक घटक असतात. आपण कच्चे दूध पिऊ शकतो का?

दूध न उखळता प्यायल्यावर पोषक तत्वे मिळतात

कच्च्या दुधात व्हिटॅमिन डी, बी 12, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते

दूध प्यायल्याने दात, हाडे, नखे, केस मजबूत होतात आणि स्नायू निरोगी राहतात

आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता म्हणतात की पॅकेज्ड दूध कच्चे सेवन केले जाऊ शकते कारण ते पाश्चराइज्ड असते

 परंतु गाय, म्हशी आणि बकरीचे कच्चे दूध पिणे टाळावे

गाय, म्हशी आणि शेळीच्या दुधात साल्मोनेला, लिस्टेरिया सारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात जे रोगांना कारणीभूत ठरू शकतात.

लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी ते पिणे विशेषतः टाळावे

त्वचेसाठी कच्चे दूध वापरू शकता. त्वचा स्वच्छ करण्यासाठी, टॅनिंग काढून टाकण्यासाठी उपयुक्त असते