लोण्यासारखी मऊ होईल त्वचा, थंडीत लावा 'या' गोष्टी
28 November 2023
Created By : Manasi Mande
थंडीत बऱ्याच लोकांच्या हात-पायांची त्वचा फुटते. त्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर उपयुक्त ठरतो.
थंडीत त्वचा कोरडी पडून फुटत असेल तर कोरफडीचे जेल आणि ग्लिसरीन मिसळून लावा.
त्वचेच्या पोषणासाठी नारळाचे तेल उत्तम ठरते. झोपण्यापूर्वी कोमट तेलाने त्वचेला मालिश करावे.
घरगुती, देशी शुद्ध तुपाचा वापरही त्वचेसाठी लाभदायक ठरतो. यामुळे ड्रायनेस कमी होऊन त्वचा मुलायम बनते.
त्वचा मऊ बनवण्यासाठी आणि रंग उजळवण्यासाठी दुधाची साय आणि हळद मिक्स करून लावणे हाही उत्तम पर्याय आहे.
मधामध्ये मॉयश्चरायझिंग गुणधर्भ भरपूर असतात. हिवाळ्यात हाता-पायांना मध लावून १० मिनिटे ठेवा मग कोमट पाण्याने धुवून टाका.
थंडीत तहान कमी लागते, पण तरीही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा आतून हायड्रेटेड राहते आणि कोरडी पडत नाही.
पांढऱ्या केसांना वैतागलात ? नारळाच्या तेलामध्ये ‘हे’ पदार्थ मिसळा आणि पहा फरक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा