कलिंगड, टरबूज खाण्याआधी घ्या अशी काळजी, नाहीतर...

28  May 2024

Created By :  Manasi Mande

देशभरात सध्या भीषण गरमी आहे. अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर पोहोचलाय.

हीटवेव्हच्या काळात हायड्रेटेड राहण्यासाठी एक्सपर्ट्स हे टरबूज, कलिंगड खायचा सल्ला देतात.

पण बऱ्याच वेळा उन्हाळ्यात टरबूज वगैरे खाऊन लोकांना फूड पॉयझनिंगचा त्रास होतो.

एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, फळांचा रंग, चव वाढवण्यासाठी कृत्रिम रंग किंवा शुगर सिरपचा वापर केला जातो.

त्यातील केमिकल्स ही आरोग्यासाठी अतिशय घातक असतात.

तसेच ज्या मातीत ही फळं पिकतात तेथून धोकादायक बॅक्टेरियाही फळांत येतात, जे फूड पॉयझनिंगसाठी कारणीभूत ठरू शकते.

त्यामुळे टरबूज किंवा कलिंगड खाण्यापूर्वी ती पाण्याने स्वच्छ धुवा, त्यांची सालंही नीट स्क्रब करा. .

नंतर ३ कप पाण्यात थोडंस व्हिनेगर घालून फळं पुन्हा स्वच्छ धुवा. त्यामुळे बॅक्टेरिया कमी होतात.

तसेच फळांमध्ये कृत्रिम रंग  किंवा शुगर सिरप आहे का हे चेक करण्यासाठी फळं अर्ध कापा आणि त्याच्या पृष्ठभागावरून हलक्या हाताने कापूस फिरवा.

कापूस लाल झाला तर समजावं की त्या फळामध्ये एरिथ्रोसिन मिसळलेलं आहे.