डेंग्यू झाल्यावर कोणती तीन लक्षणे निश्चितपणे दिसून येतात?

16 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. एडिज डासाच्या चावण्यामुळे पसरतो. हे डास घाणेरड्या पाण्यात प्रजनन करतात

डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

डॉ. सुभाष गिरींनी सांगितल, डेंग्यूमुळे अचानक उच्च ताप येतो, जो 104°F पर्यंत पोहोचू शकतो. तापासोबत थंडी वाजून येते

डेंग्यूला अनेकदा "ब्रेकबोन फिव्हर" ही म्हणतात. शरीरात हाडे तुटल्यासारखे वाटते. पाठ, कंबर, हात, पाय,सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात

ताप आणि वायरसमुळे शरीराची ऊर्जा झपाट्याने कमी होते. सतत थकवा, सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो.

पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणी आणि प्रतिबंधक औषधे वापरा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. ताप आसल्यास रक्ततपासणी करून घ्या