उन्हाळ्यात मनुके खाल्ल्याने कोणते आजार नियंत्रणात राहतात?

15 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

मनुकामध्ये व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम असे अनेक पोषक तत्वे आढळतात

मनुका पोषक तत्वांनी समृद्ध असतात. उन्हाळ्यात ते खाल्ल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येतं

मनुकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था सुधारते. हे बद्धकोष्ठता दूर करते

मनुकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स असते, जे अशक्तपणा म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करते. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढवते

 मनुकामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा चमकदार असतात

 मनुकामध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करते. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते

मनुका शरीराला आतून थंड करते, त्यामुळे उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण होते