कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती ?
08 December 2023
Created By : Manasi Mande
बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. आरोग्यासाठीही कॉफी उत्तम असते असे तज्ज्ञ म्हणतात.
काही जण सकाळ-संध्याकाळ किंवा रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पितात.
पण कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, हे तुम्हाला माहीत आहे का ?
लाइफस्टाइल रूटीन नॉर्मल असेल तर सकाळी उठल्यावर तासाभराने कॉफी पिणं चांगलं.
तुम्ही रात्री उशीरापर्यंत काम करत असाल तर 9च्या सुमारास कॉफी प्यायल्याने फायदा होतो.
तुम्ही रोज वर्कआऊट करत असाल तर व्यायामाच्या 30 ते 60 मिनिटं आधी कॉफी प्यावी.
सकाळी उठल्यावर लगेच किंवा रिकाम्या पोटी कॉफी कधीच पिऊ नये.
तेलात मिसळा हा 5 रुपयांचा पदार्थ, कोंडा होईल छू-मंतर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा